Delhi Weather : दिल्लीमध्ये ऑरेंज अलर्ट; तापमानाचा पारा ४.४ अंश सेल्सिअसवर

Delhi Weather :  नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन झाले आहे. दिल्लीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यासोबतच दिल्लीत थंडीचा पारा ४.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. ४८ तासांत दिल्लीचा पारा ८.५ वरून ४.४ वर घसरला आहे.

दिल्लीत थंडगार वारे वहात असल्याने दिल्लीकर अक्षरशः कुडकुडत आहेत. आज (५ जानेवारी) सकाळी दिललीत यंदाच्या हंगामातील सर्वात किमान तापमान ४.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. येत्या दोन दिवसांत रात्रीच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काडकाच्या थंडीमुळे ग्रामीण भागासह शहरातही शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे.

दाट धुक्यामुळे दिल्लीतील दृश्यमानता २०० मीटरपर्यंत कमी झाल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर प्रतीकूल परिणाम झाला आहे. परिणामी दिल्लीकडे येणाऱ्या किमान २९ रेल्वेगाड्या दीड ते साडेचार तास उशिराने धावत आहेत. यासोबतच दिल्लीत वाढती थंडी  पाहता पुढील 2 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

दरम्यान, हवामान खात्याने आज उत्तर प्रदेश, राजस्थानसह पंजाब, जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये पुढील दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट' कायम ठेवण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply