Delhi Politics : निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

Delhi Politics : दिल्लीत लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का आहे. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठवला आहे. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज सांगितलं  आहे.

लोकसभा निवडणुकीची उमेदवारी नाकारल्यामुळे लवली नाराज होते. दिल्लीत आप आणि काँग्रेस यांच्या आघाडीमुळे देखील लवली नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांनी फक्त काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता.. शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप

दिल्ली काँग्रेस पक्षावर खोटे, बनावट आणि गैरप्रकार तसेच भ्रष्टाचाराचे आरोप लावण्याच्या आधारावर स्थापन झालेल्या पक्षाशी युती करण्याच्या विरोधात होते, असं असून देखील पक्षाने दिल्लीत आपशी युती करण्याचा निर्णय घेतला..,' असं अरविंदर सिंग लवली  यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलं आहे.

अरविंदर सिंग लवली  यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठवला आहे. लवली यांनी राजीनामा पत्रात अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यानुसार लवली दिल्लीत आम आदमी पार्टी (आप) सोबतच्या युतीच्या विरोधात होते. दिल्लीत काँग्रेसला केवळ तीन जागा दिल्याचंही ते म्हणाले आहेत. या तीनपैकी दोन जागा बाहेरच्यांना दिल्याने लवलीही नाराज असल्यांचं सांगितलं जात आहे. तसंच त्यांनी उमेदवारांच्या घोषणेपूर्वी माहिती देण्यात आली नव्हती, असंही सांगितलं आहे. लवली यांचा लोकसभा निवडणुकीपूर्वी अध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply