Delhi Politics : दिल्ली लोकसभेसाठी 'आप'चा काँग्रेसला अल्टिमेटम; वेळीच निर्णय द्या नाहीतर..

Delhi Politics : येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकांची घोषणा केली जाईल. यापार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपला सत्तेपासून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून या आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसत आहे. एक एक करून राजकीय पक्ष आपली वेगळी चूल मांडत आहे.

ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि जयंत राऊत यांनी 'इंडिया' आघाडीपासून वेगळं होत वेगळी चूल मांडलीय. आता पंतप्रधान  मोदींचे कट्टर विरोधक अरविंद केजरीवाल  हेदेखील इंडिया आघाडीतून वेगळं होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस आणि आपमध्ये जागा वाटपावरून ओढताण सुरू आहे.

Balasaheb Thorat : अशोक चव्हाण गेले आता बाळासाहेब थोरातांकडे महत्त्वाची जबाबदारी; मल्लिकार्जुन खरगेंचा आला फोन

दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला एक जागा देऊ असं आपकडून सांगण्यात आले आहे. आम आदमी पक्ष दिल्लीतील ६ लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवेल तर काँग्रेसला एक जागा देऊ असं आपचे नेते संदीप पाठक यांनी माध्यमांना सांगितले आहे. जागांविषयी निर्णय देताना संदीप पाठक यांनी काँग्रेसला अल्टिमेटदेखील दिलंय.

आपकडून देण्यात आलेला प्रस्ताव काँग्रेसला मान्य असेल तर त्यांनी वेळेआधीच निर्णय द्यावा. नाहीतर आम्ही दिल्ली लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा करू असं पाठक यांनी स्पष्टपणे म्हटलंय. िल्ली आणि पंजाबमध्ये इंडिया आघाडीत बिघाडी सुरू असतानाच संदीप पाठक यांचे हे विधान आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंजाबमधील तरनतारन येथे एका रॅलीला संबोधित करताना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी जागावाटपाबाबत मोठे विधान केलं होतं. आपने सर्व सात जागांवर निवडणूक लढवावी अशी जनतेची इच्छा आहे , असं केजरीवाल म्हणाले होते.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply