Delhi MCD Election : दिल्ली 'आप'ची, भाजपला दे धक्का; 15 वर्षांची सत्ता उलथून महापालिकेवर आपचा कब्जा

Delhi MCD Election 2022 : दिल्ली महानगरपालिका (MCD) निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. आपने येथे स्पष्ट बहूमत मिळवत मागील 15 वर्षांपासूनची भाजपची सत्ता उलथून लावली आहे.महापालिकेतील 250 जागांपैकी आम आदमी पक्षाला आतापर्यंत 134 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच आपने बहुमताचा आकडा सहज पार केला आहे.

तर भाजपने 104 तर काँग्रेसला 9 जागा मिळाल्या आहेत. इतरांनी 3 जागा जिंकल्या आहेत. 4 डिसेंबर रोजी एमसीडीच्या 250 जागांवर मतदान झाले होते. या निवडणुकीत 250 प्रभागांमध्ये एकूण 1349 उमेदवार रिंगणात होते. गेल्या १५ वर्षांपासून दिल्ली एमसीडीवर भाजपचे नियंत्रण होते. मात्र यावेळी आम आदमी पक्षाला दिल्ली महापालिका जिंकण्यात यश आले आहे.

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या विजयावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील जनतेचे आभार मानतो, हा मोठा विजय आहे. दिल्लीच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन. दिल्लीच्या लोकांनी त्यांच्या मुलाला आणि भावाला आशीर्वाद दिला. शाळा आणि रुग्णालये सुरळीत करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत केली आहे.

पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले की , आज दिल्लीच्या जनतेने दिल्ली स्वच्छ करण्याची जबाबदारी दिली आहे. दिल्लीतील जनतेचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. दिल्लीतील आप कार्यालयात जल्लोषाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply