IPL 2024: दिल्लीच्या पहिल्या विजयानंतरही पंतला धक्का! CSK विरुद्धच्या सामन्यानंतर झाली मोठी कारवाई

Delhi Capitals captain Rishabh Pant fined: इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत रविवारी (31 मार्च) 13 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. विशाखापट्टणमला झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 20 धावांनी विजय मिळवला. हा दिल्लीचा या हंगामातील पहिलाच विजय आहे.

मात्र या विजयानंतरही दिल्लीला एक मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्याच्यावर 12 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नईविरुद्धच्या या सामन्यात दिल्लीकडून षटकांची गती कमी राखली गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे .

आयपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात माहिती देण्यात आली आहे की आयपीएलच्या आचार संहितेतील षटकांच्या गतीबाबतच्या नियमाचा भंग करण्याची ही दिल्ली कॅपिटल्सची पहिलीच वेळ आहे. त्याचमुळे यावेळी कर्णधार पंतला 12 लाखांचा दंड ठोठावण्याच आला आहे.

MS Dhoni: 'सामना हरलोय असं वाटलंच नाही...!', CSKच्या पराभवानंतर धोनीच्या पत्नीची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

दरम्यान, आयपीएलच्या 17 व्या हंगामात अशी कारवाई होणारा पंत पहिलाच कर्णधार नाही, तर यापूर्वीही गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलवरही ही कारवाई झाली आहे.

नियमानुसार षटकांची गती कमी राखल्याची चूक संघाकडून पहिल्यांदा झाल्यास संघाच्या कर्णधारावर 12 लाखांचा दंड आकारला जातो. तसेच दुसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधारावर 24 लाखांचा आणि संघातील इतर खेळाडूंवरही 6 लाख किंवा सामना शुल्कातील 25 टक्के, जी रक्कम कमी असेल, तो दंड ठोठावला जातो.

त्याचबरोबर तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधाराला 30 लाखांच्या दंडाबरोबरच एका सामन्याची बंदीही घातली जाते. तसेच संघातील इतर खेळाडूंवरही 12 लाख किंवा सामना शुल्कातील 50 टक्के, जी रक्कम कमी असेल, तो दंड ठोठावला जातो.

दिल्लीचा विजय

दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 191 धावा केल्या होत्या. त्यानंतर 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकात 6 बाद 171 धावाच करता आल्या.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply