Deepak Kesarkar News : राज्यातील खासगी शाळा सरकार ताब्यात घेणार? शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

Deepak Kesarkar on Private School : राजस्थान सरकारने सर्व शाळा स्वतःच्या ताब्यात घेतल्या असून, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही धोरणात्मक निर्णय घेण्याची राज्य सरकारची तयारी आहे, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. शिक्षणमंत्र्यांच्या या इशाऱ्यानंतर खासगी शाळांच्या संस्थाचालकांचे चांगलेच धाबे दणाणले होते. 

राज्यातील खासगी शाळा शासन ताब्यात घेणार?

राज्य सरकार खरचं राज्यातील खासगी शाळा ताब्यात घेणार का? अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, राज्यातील खासगी शाळा ताब्यात घेण्यावरून शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यातील‌ कोणत्याही खासगी शाळा ताब्यात घेण्याचा सरकारचा विचार नाही, असं दीपक केसरकर म्हणाले. 

शिक्षण मंत्र्यांच्या या स्पष्टीकरणामुळे राज्यातील खासगी शिक्षण संस्था चालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे आज पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. सध्यातरी सरकारकडून खासगी शाळा ताब्यात घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे केसरकर यांनी सांगितले.

काय म्हणाले दीपक केसरकर?

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा राज्य सरकार ताब्यात घेणार अशी चर्चा सुरू आहे. याविषयी विचारले असता, सध्यातरी असा कोणताही विचार नसल्याचे केसरकर यांनी सांगितले. परंतू कोणी संस्थाचालक पुढे आले तर त्यांचाही सरकार विचार करेल असे ते म्हणाले.

लवकरच राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी शिक्षणमंत्री केसरकर यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply