DCM Fadnavis : सेमी फायनलमध्ये आम्ही जिंकलोच फायनलमध्येही आम्हीचं जिंकू: देवेंद्र फडणवीस

DCM Fadnavis : तीन राज्यात झालेल्या निवडणुकांची सेमी फायनल आम्ही जिंकली. आता फायनलही आम्हीच जिंकणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधीमंडळाच्या  हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापानचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. विरोधकांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. विरोधकांच्या बहिष्कारावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी  विरोधकांवर टीका केली.

तीन राज्यात भाजपला मोठा विजय मिळाला. पंतप्रधान मोदींचा करिष्मा संपला असं म्हणणाऱ्यांना या विजयातून उत्तर मिळालं. भाजपच्या विजयावरून फडणवीस म्हणाले की, तीन राज्यातील पराभव पाहून त्याच्यातून काहीतरी आत्मपरीक्षण विरोधक करतील. ईव्हीएम आणि दक्षिण विरूद्ध उत्तर भारत करत त्यांनी त्यांचं समाधान केल्याचं फडणवीस म्हणाले.

Rohit Pawar : पीक विम्याचे ७८ रुपये देऊन सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केली; रोहित पवारांचा हल्लाबोल

चहापानच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी तीन राज्यात भाजपला मिळालेल्या विजयावरून विरोधकांना टोला लगावला. चार राज्यात चक्रीवादळ येऊन गेलं. त्यामुळे पुढच्या चार दिवसांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश दिलेत. अधिकाऱ्यांना जिथे शेतीचे नुकसान होतंय तिथे तातडीने पंचनामे करुन मदत देण्याचे निर्देश दिले आहेत”,अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आधी दिली. त्यानंतर त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांनी देशातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरुन सरकारवर सडकून टीका केली. विरोधकांच्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलं. गुन्ह्यांच्याबाबत लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे.
खूनांच्या बाबत महाराष्ट्र १७ क्रमांकावर आहोत. महिलांच्या बाबत घटनांमध्ये महाराष्ट्र ७व्या क्रमांकावर आहे. बलात्कार हा अतिशय घृणास्पद प्रकार आहे. यामध्ये महाराष्ट्र १२व्या क्रमांकावर आहे. अपहरणाच्या घटना महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. एनसीआरबीचा रिपोर्ट कसा वाचला पाहिजे, याचं प्रशिक्षण विरोधकांना दिलं पाहिजे,अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply