Pune Solapur Highway Accident : हायवे ओलांडताना काळजी घ्या! दौंड तालुक्यातील मळद येथील दांपत्याला 'ती' चूक भोवली

 

Daund  : राज्यात एकीकडे हिट एड रन च्या केसेसच्या बातम्या चर्चेत असताना. पुणे - सालोपूर राष्ट्रीय महामार्गावर एक विचित्र अपघात घडला आहे. खानदेशातील असणाऱ्या जोडप्यासोबत रस्ता ओलांडत असताना दुर्देवी घटना घडली आणि क्षणात दोघांनी जागीच जीव गमावला. रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यावरचा दुभाजक ओलडण्यांचा प्रयत्न पती पत्नी करत होते, दुभाजक ओलांडून पलीकडे जाणाऱ्या दांपत्याला मागून येणाऱ्या लक्झरी बसने जोरात धडक दिली आणि यात दोघे पती पत्नी हवेत उडाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोघेही पती पत्नी दौंड तालुक्यातील मळद येथे सध्या वास्तव्याला होते, मूळचे दोघेही खानदेशातील असलेले गंगाधर यादव आणि त्यांची पत्नी सुमन यादव याचा घटनेत जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सकाळी दहा वाजता ही दुर्घटना घडली असल्याची स्थानिकांनी माहिती दिली आहे.

Sharad Pawar : पुण्याचा वाढता विस्तार, नवीन महापालिकेची तातडीने गरज, शरद पवार यांची भूमिका

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग नेहमीच वर्दळीचा असतो. राष्ट्रीय महामार्ग असल्याने अनेक मोठी वाहनांची ये जा कायम सुरु असते. मळद येथे घागरेवस्ती नजीक गंगाधर यादव आणि सुमन यादव दोघेही गावाकडून दुसऱ्या बाजूला निघाले होते. रस्त्यावरचा दुभाजक ओलांडताना त्यांना भरधाव वेगाने येणारी लक्झरी बस दिसली नाही, तर पाठीमागून येणाऱ्या लक्झरी चालकाला सुद्धा रस्ता ओलांडून जाणारे दाम्पत्य दिसले नाही आणि याच लक्झरी बसने जोरात धडक दिली.

या धडकेने यादव दांपत्य हवेत उडाले आणि रस्त्यावर जोरात आपटले. गंभीर जखमी झालेले पती गंगाधर आणि पत्नी सुमन दोघांचाही जागीच मृत्यू झाला. उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी पोलीसांना दिली. दरम्यान याच प्रकरणात कुरकुंभ पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास कुरकुंभ पोलीस करत आहेत. अनेकदा राष्ट्रीय महामार्ग किंवा महामार्ग ओलडतांना नागिरक शॉर्टकर्टचा विचार करतात, पण असाच शॉर्टकट घेणे यादव कुंटुंबाच्या जीवावर बेतले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply