Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कोण मारणार? १० ऑक्टोबरपर्यंत BMC घेणार निर्णय

Dasara Melava : दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान कोण मारणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कुणाचं? याचा निर्णय येत्या १० ऑक्टोबरपर्यंत महापालिका प्रशासन घेणार आहे.

गेल्या वर्षीप्रमाणेच महापालिका निर्णय घेण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. दसरा मेळावा तोंडावर आला असताना मुंबई महापालिकेसमोर शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याकरता परवानगी कुणाला द्यायची हा पेच निर्माण झाला आहे. 

Nanded Hospital News : नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच, रुग्णालयात आणखी ७ रुग्ण दगावले; मृतांचा आकडा ३१ वर

ठाकरे आणि शिंदे गट या दोघांकडूनही दसरा मेळावा करता शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठीचे अर्ज पालिकेकडे यापूर्वीच दाखल झाले आहेत. तयारीकरता वेळ कमी असल्यानं लवकरात लवकर महापालिकेनं निर्णय घ्यावा ही मागणी ठाकरे गटाने केली आहे.

महापालिका मैदानाची परवानगी देण्यासंदर्भात सावध भूमिकेत आहे. मात्र यावेळी देखील आम्हालाच मैदान मिळेल असा विश्वास ठाकरे गटाला आहे. तर आमचा हक्क आम्ही सोडणार नाही. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कावरच होणार, असा दावा शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार संजय गायकवाड यांनी केला आहे.

त्यामुळे ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांचा शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावं असा आग्रह आहे. मागच्या वर्षी शिंदे गटाने बीकेसी येथे आपली दसरा मेळाव्याची सभा घेतली होती. मात्र विविध विकासकामं सुरु असल्याने यावर्षी बीकेसी येथे मोठ्या सभेचं आयोजन करणेही शक्य होणार नाही. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान कुणाला मिळणार, याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply