Darshana Pawar Case : दर्शना पवार हत्या प्रकरण! खूनात वापरलेले कटर आणि दुचाकी पोलिसांकडून जप्त; राहुल हांडोरच्या पोलीस कोठडीत वाढ

Pune Crime : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुण्यातील दर्शना पवार हत्याकांडात रोज नवनवे खुलासे होत आहेत. लग्नाला नकार दिल्यामुळे एमपीएससी पास दर्शनाची मित्रानेच निर्घृण हत्या केली होती.

या हत्येतील मुख्य आरोपी राहुल हांडोरे सध्या पोलिस कोठडीत असून त्याच्या माहितेच्या आधारे पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले कटर आणि बाईक जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की,पुण्यातील एमपीएससी पास दर्शना पवारची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. १८ जून रोजी दर्शना हिचा राजगडच्या  पायथ्याशी मृतदेह सापडला होता. ज्यानंतर पोलिस तपासात राहुल हांडोरे या मित्रानेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला २१ जून रोजी मुंबईत अटक करण्यात आली होती.

Pune : भयंकर! आधी पत्नीचा गळा आवळला, नंतर दोन मुलांना विहिरीत फेकलं; पुण्यातील डॉक्टरने अख्खं कुटुंबच संपवलं

ती राहुलसोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेल्याचे समोर आले होते. यावेळी विवाहास नकार दिल्याने दर्शनावर कंपासमधील कटरने तीन ते चार वेळा वार केले. त्यानंतर दगडाने मारहाण करत तिचा खून केला, अशी कबुली राहुलने नुकतीच पोलिसांना दिली. पोलिसांनी खुनासाठी वापरलेले कंपासमधील कटर पोलिसांनी आरोपी राहुल हांडोरे याच्याकडून जप्त केले आहे.

राहुल आणि दर्शना यांनी राजगडला जाण्यासाठी वापरलेली दुचाकी आणि खून करताना आरोपीने घातलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत. पुढील तपासासाठी आरोपी राहुल हांडोरेच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यत वाढ करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply