Dam Water Level : नागपूरकरांची तहान भागविणाऱ्या धरणात किती पाणीसाठा शिल्लक?

Nagpur water crisis Totladoh water level : नागपूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेल्या तोतलाडोह प्रकल्पातील जलसाठा 57.10% पर्यंत खाली आला आहे, तर कामठी खैरी प्रकल्पात 75.70% साठा शिल्लक आहे. खिंडसी (46.8%), वडगाव (27.75%) आणि नांद (12%) प्रकल्पांमध्येही पाणी कमी आहे. सध्या उन्हाळ्यासाठी पुरेसा साठा असला तरी पावसाळा लांबल्यास पाणीकपातीचा धोका कायम आहे. हिंगणा तालुक्यातील गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, जिल्हा परिषदेने 37.48 लाखांचा आराखडा तयार केला आहे, ज्यामध्ये विहीर अधिग्रहण, नळयोजना दुरुस्ती आणि विहीर खोलीकरणाचा समावेश आहे.

नागपूरकरांची तहान भागविणाऱ्या सर्वात मोठा तोतलाडोह प्रकल्पात 57.10% जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत 2.02 टक्के अधिक पाणीसाठी आहे. तर कामठी खैरी प्रकल्पात 75.70% जलसाठा आहे, गेल्यावर्षी 75.43 टक्के होता. खिंडसी प्रकल्पात 46.8 टक्के वडगाव धरणात 27.75 टक्के तर नांद प्रकल्पात सर्वात कमी 12 टक्के आहे. तोतलाडोह व कामठी खैरी प्रकल्पात पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने नागपूर शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाही. पण पावसाळा लांबला तर नागपूरकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागेल.

Pune : दुबईहून पुण्यात आला, विमानतळावरच व्यवसायिकाच्या बॅगमधून चोरी

उन्हाळभर पुरेल एवढा पाणीसाठा -

नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जलसाठा उन्हाळभर पुरेल एवढा आहे. मात्र नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील काही गावात पाण्याची टंचाई आहे. या भागात 15 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे तर 40 खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने 37.48 लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यात विहीर अधिग्रहण, नळयोजना दुरुस्ती,नवीन विंधन विहीर घेणे, विहीर खोलीकरण अश्या कामांचा समावेश आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply