Dahi Handi 2023 : लोकसभेची हंडी मोदीचं फोडणार; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : दहीहंडीनिमित्त देशभरात सध्या उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईतही नेहमीच्या उत्साहात दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज आहेत. ठाण्यातील टेंभी नाका मित्रमंडळाच्या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. तसेच २०२४ ची दहीहंडी नरेंद्र मोदींच फोडणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

परंपरा टिकली पाहिजे

शिंदे म्हणाले, टेंभी नाक्यातील सर्व गोविंदा सर्वात आधी आनंद दिघेंच्या दहीहिंडीला सलामी देतात. आजही त्यांच्यात दहीहंडीचा उत्साह कायम आहे. त्यामुळं सर्वात आधी या गोविंदांना शुभेच्छा. तरुणाईचा प्रचंड उत्साह इथं पहायला मिळतो आहे

ही आपली परंपरा आहे, ही संस्कृती आहे. हे सण, उत्सव वाढले पाहिजेत, ही भावना मनात ठेऊन आनंद दिघेंनी गोविंदा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे अनेक सण सुरु केले. सनातन धर्मातही या गोविंदा उत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे.

Dahi Handi 2023 : मुंबईत दहीहंडी फोडताना 2 गोविंदा जखमी, दोघांवर केईएम-राजवाडी रुग्णालयात उपचार सुरु

मोदीच लोकसभेची हंडी फोडतील

राज्य सरकार ज्याप्रमाणं विकासाचे थर लावत आहे, त्याचप्रमाणं इथले गोविदा पथकांकडून विकासाचे थर लावले जात आहेत. अहंकाराचे थर कोसळले आणि विकासाचे, प्रगतीचे थर आता सुरु झालेले आहेत.

देशात आणि राज्यात मोदींविरोधात सर्व इंडिया आघाडीचे लोक एकत्र येत आहेत. ते कितीही एकत्र आले तरी २०२४ ची लोकसभेची हंडी नरेंद्र मोदींच फोडतील, असा विश्वास सर्व देशवासियांना आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply