Dadar Railway Station Threat call : दादर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी; मध्यरात्री धमकीचा फोन

Dadar Railway Station Threat call : मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. दादर रेल्वे स्टेशनला उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. मध्यरात्री ११२ या हेल्पलाईनवर धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी वसईच्या पेल्हार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्वात जास्त प्रवाशांची वर्दळ असलेल्या दादर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. मध्यरात्री ११२ हेल्पलाईनवर धमकीचा फोन आला होता. विकास शुक्ला नावाच्या व्यक्तीने कॉल करून धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर वसईच्या पेल्हार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.

Pune Crime News : कोयत्याने वार, २ तरुण रक्तबंबाळ! तरुणीसाठी पुण्यात भरदिवसा थरारक घटना

पोलिसांच्या हेल्पलाईनला कॉल येताच यंत्रणा सतर्क झाली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी दादर रेल्वे स्थानकाची तपासणी केली. मात्र, या पथकाला दादर रेल्वे स्टेशनवर काहीही संशयास्पद आढळलं नाही.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांच्या ११२ हेल्पलाईनला कॉल आला होता. पोलिसांच्या हेल्पलाईनच्या नागपूर कार्यालयात रात्री १२ फोन आला. त्यांनी तातडीने मुंबई पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांना कळवलं. त्यानंतर दादर पोलीस, रेल्वे पोलीस,बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तात्काळ दादर रेल्वे स्टेशनची तपासणी केली. या तपासणीत काहीही संशयास्पद आढळलं नाही. आरोपीने कॉल करून लोकांना सतर्क करण्यासाठी कॉल केला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply