Dadar News : मुंबईत 'उडता पंजाब'! दादरमधून ५ किलोचा ड्रग्ज जप्त, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Dadar News : मुंबईच्या दादरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. दादरमधून पोलिसांनी तब्बल १०.०८ कोटी किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केली आहे. तसेच कारवाई करत दोघांना अटक केली आहे. अमली पदार्थांबाबत त्यांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दादरच्या गेस्ट हाऊसवर छापा टाकला. या छाप्यात जवळपास ५ किलोचा एमडी ड्रग्ज सापडल्यानं खळबळ उडाली आहे.

राज्यात अमली पदार्थांच्या तस्करी सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. अशातच भर वर्दळीचे ठिकाण असणार्‍या दादरमधून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. दादरच्या गेस्ट हाऊसमध्ये पोलिसांनी छापा टाकत अमली पदार्थ जप्त केले आहेत. तसेच कारवाई केल्यानंतर पोलिसांनी २ आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

Kalyan News : मुंबई लोकलमध्ये राडा, धक्का लागला म्हणून ३ जणांवर चाकूने हल्ला

मुंबई गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिट ९नं अधिकारी दयानायक यांच्या नेतृत्वाखाली, १९ फेब्रुवारीला रात्री १० वाजताच्या दरम्यान दादर पूर्व रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलवर छापा टाकला. समर लँड गेस्ट हाऊस हॉटेलमधील एका खोलीत छापा टाकण्यात आला होता. त्याठिकाणी पोलिसांनी १०.०८ कोटी किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. जवळपास ५ किलोचा एमडी ड्रग्जचा साठा आढळून आला आहे.

पोलिसांनी कारवाई केल्यानंतर मुंबईतील जहांगीर साहा शेख आणि पश्चिम बंगालमधील सेनॉल शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी मुंबईतील गोवंडी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply