Cyclone Remal : अतिभयंकर 'रेमल' चक्रीवादळ आज धडकणार, तुफान पाऊस कोसळणार; अनेक भागांना अलर्ट

Cyclone Remal :  बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचे रुपांतर हे चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाला 'रेमल' असे नाव देण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपारा किनारपट्टीवर धडकू शकते.

परिणामी काही भागांत वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी (२६ मे) पहाटे बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. यादरम्यान वाऱ्यांचा ताशी वेग १०० ते १२० किमी प्रतितास असू शकतो, असंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

Gujarat Fire Accident : राजकोट गेमिंग झोन दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; PM मोदी हळहळले, पोस्ट करत व्यक्त केलं दु:ख

रेमल हे मान्सूनच्या आगमनानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले पहिले चक्रीवादळ आहे. आयएमडीचे मते, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर खोल दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या चक्रीवादळ 'रेमाल'चे केंद्र खेपुपारा पासून सुमारे ३६० किमी दक्षिण-दक्षिणपूर्व आणि सागर बेटाच्या ३५० किमी दक्षिण-पूर्वेस आहे.

आयएमडीने सांगितले की, वादळाची तीव्रता आणखी तीव्र होऊन रविवारी सकाळपर्यंत त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. रविवारी मध्यरात्री सागर बेट आणि खेपुपारा दरम्यान पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशच्या किनारपट्टीला चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.

यापार्श्वभूमीवर २६ ते २७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय २७-२८ मे रोजी ईशान्य भारतातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे.

याशिवाय दक्षिण आणि उत्तर 24 परगणा सारख्या पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये २६-२७ मे साठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोलकाता, हावडा, नादिया आणि पूरबा मेदिनीपूर जिल्ह्यांमध्ये 26-27 मे साठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply