Cyclone Mandous : देशावर मंदोस चक्रीवादळाचं संकट ; राज्यातील नागरिकांना वादळाचा तडाखा बसणार

Cyclone Mandous News : वातावरणातील बदलामुळे सध्या देशभरात कडाक्याची थंडी पडलेली पाहायला मिळत आहे. नागरिक कडाक्याच्या थंडीने त्रस्त असतानाच काही राज्यांसाठी आणखी एक धोक्याची घंटा वाजली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले मंदोस चक्रिवादळ ९ डिसेंबरच्या रात्री आंध्रप्रदेशमधील श्रीहरीकोटा आणि पाँडिचेरीच्या मधून जाणार असल्याने तमिळनाडूमधील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे ६ डिसेंबरला खोल दाबात रुपांतर झाले होते. हे वादळ बुधवारी चेन्नईपासून ७५० किमी दूर होते.त्याआधीच प्रशासनाने सुरक्षिततेची आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिता लक्षात घेत शाळा आणि महाविद्यालयांची घोषणा करण्यात आली आहे.
 
मंदोस वादळाचा धोका असलेले पाँडेचरी चेन्नईपासून १६० किलोमीटर दूर आहे. त्यामुळेच तमिळनाडू सरकारने मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेत खबरदारी म्हणून आवश्यक पाऊले उचलली आहेत. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ८०- ८५ प्रतितास वेगाने या वादळाची तीव्र वादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. तसेच शुक्रवारी मध्यरात्री महाबलीपुरमजवळ तामिळनाडू किनारपट्टीवर पोहोचण्यापूर्वी हे वादळ सौम्य होईल. त्याआधीच प्रशासनाने बचाव कार्याच्या पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
 
हे चक्रिवादळ उत्तर तामिळनाडू, तसेच पाँडेचरी तसेच दक्षिण आंध्रप्रदेशमधून पाँडेचरी आणि श्रीहरीकोटाच्या मध्यातून महाबलीपुरमच्या जवळून ६५- ७५ प्रतितास हव्याच्या वेगाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ८५ किमीच्या वेगाने जाण्याची शक्यता आहे. या वादळामुळे सुरक्षितता बाळगण्याचे आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांनी शुक्रवारी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यासाठी तयार राहण्याची सुचना महापात्रांनी दिली आहे. किनारपट्टीवरील तामिळनाडू, पाँडेचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळेच या भागातील लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply