
Cyclone Biporjoy : सध्या अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. 'बिपरजॉय' नावाचे चक्रीवादळ हळूहळू भारताकडे सरकत आहे. या चक्रीवादळाच्या तडाख्यात चार राज्ये येऊ शकतात असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. एकीकडे मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर असताना अचानक चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने अनेकांची चिंता वाढली आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 'बिपरजॉय' या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका हा गुजरातला आहे. याशिवाय त्याचा परिणाम महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातही होण्याची भीती आहे. पुढील ४८ तासांत हे चक्रीवादळ आणखी तीव्र स्वरूप धारण करू शकते, असे सांगण्यात येत आहे.
चक्रीवादळाचा वाढता धोका लक्षात घेता, गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यासोबतच राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या 11 पथकांनाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर मच्छिमारांना खोल समुद्रातून परतण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, 'बिपरजॉय' हे चक्रीवादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रातून हळूहळू उत्तर आणि वायव्येकडे सरकत आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या हे वादळ पोरबंदरच्या नैऋत्येला ९३० किमी अंतरावर आहे. हवामान खात्यानुसार, या वादळामुळे ताशी 135 ते 145 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. ज्याचा परिणाम किनारी भागात होऊ शकतो.
अहमदाबादमधील हवामान विभागाच्या विज्ञान केंद्राचे संचालक मनोरमा मोहंते यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला सांगितले, की “बिपरजॉय या चक्रीवादळामुळे 10, 11 आणि 12 जून रोजी वाऱ्याचा वेग वाढू शकतो".
वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 नॉट्स वेगाने वाहू शकतो. त्याचबरोबर चक्रीवादळामुळे दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रसह किनारपट्टी भागात हलका पाऊस पडू शकतो. याबाबत सर्व बंदरांना कळविण्यात आले आहे. त्यांना चेतावणी संदेश जारी करण्यास सांगितले आहे." असंही ते म्हणाले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


