cyber fraud: मुंबईतील महिला व्हिसासाठी भरायला गेली २ रुपये अन् २ लाख गमावून बसली

पती आणि मुलीसोबत परदेशी सहलीवर जाणाऱ्या महिलेला व्हिसा प्रक्रियेत २ लाख रुपयांचा चूना लागल्याची घटना मुंबईत घडली आहे. व्हिसा एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवत आरोपीने त्यांची फसवणूक केली. व्हिसा प्रक्रियेत २ रुपये भरायचे सांगत आरोपीने त्यांना २ लाख रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

युरोप सहलीसाठी केला होता अर्ज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत चारकोप येथे राहणाऱ्या शशी निरंकारनाथ कौशल आपली पत्नी आणि मुलीसोबत युरोप सहलीवर जाण्याची योजना आखत होते. १२ जुलै रोजी त्यांनी तीन व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. हा अर्ज करुन जवळपास एक महिना झाला त्यामुळे त्यांना अर्जाची स्थिती जाणून घेण्याचे होते.

शनिवारी त्यांची पत्नी रुची गुप्ता घरी असल्याने त्यांनी स्टेटस तपासण्यासाठी http://www.vfsglobal.com वर लॉग इन केले. गुप्ता यांनी व्हीएफएस ग्लोबल कंपनीचा कस्टमर केअर नंबर मिळवला आणि त्या नंबरवर कॉल केला आणि एका प्रसिद्ध कुरिअर कंपनीकडून व्हिसाचे ट्रॅकिंग आयडी मिळवले. त्यानंतर रुची यांनी कुरिअर कंपनीच्या वेबसाइटवर लॉग इन करून कस्टमर केअरचा नंबर डायल केला वेबसाइटवर दिलेल्या नंबरवर कॉल केला पण दोन रिंगमध्ये कॉल डिस्कनेक्ट झाला.

व्हिसा एजंट असल्याचे सांगत फसवणूक

कॉल डिस्कनेक्ट झाल्यानंतर लगेचच तिला एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. आपण व्हिसा एजंट असून प्रक्रिया शुल्क भरले गेले नाही म्हणून त्यांचा व्हिसा पाठविला गेला नसल्याचे रुची यांना सांगण्यात आले. त्या व्यक्तीने रुची यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली आणि प्रक्रिया शुल्क म्हणून थोडी रक्कम भरावी लागेल त्यानंतर व्हिसा पाठवले जातील असे सांण्यात आले. यासाठी त्यांना केवळ २ रुपये भरावे लागतील अस सांगण्यात आलं होतं. मात्र, फोन करणारी व्यक्ती कोणतीही व्हिसा एजंट नसल्याचे सिद्ध झाले आहे.

आरोपीचा शोध सुरु

रुची यांनी लिंकवरुन २ रुपये भरल्यानंतर पुढील चार मिनिटांत रुची यांच्या बॅंक खात्यामधून २ लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची मेसेज त्यांना मिळाला. आरोपीने २५ हजार रुपयांचे ८ व्यवहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (सी), ६६ (डी) अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. रुची यांच्या मोबाईलवर आलेल्या एसएमएसच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply