Cyber Crime: RBI ने फ्रीज केलेल्या खात्यातून बिल्डरचे 47,000 रुपये गायब; सायबर क्राईमची नवी पद्धत

Cyber Crime: मुंबईतील वांद्रे येथील बांधकाम व्यावसायिक मोहन वाधवा यांची ई-कॉलरने 47,002 रुपयांची फसवणूक केली आहे, जेव्हा त्यांना एका टेलिकॉलर महिलेचा कॉल आला तेव्हा सांगितले की तुमच्या वाहन कर्जाचा मासिक हप्ता  भरण्यास आम्ही मदत करू शकताे. पण त्यांचे बँक खाते महिनाभरापूर्वीच गोठवण्यात आले होते.

बिल्डरचे खाते आरबीआयने महिनाभरापूर्वी गोठवले (freeze) असल्याने, त्याने कॉल करणाऱ्या महिलेला एक लिंक पाठवण्यास सांगितले आणि नंतर ती लिंक बिल्डने त्याच्या व्यवस्थापकाकडे पाठवली आणि व्यवस्थापकाला त्याच्या दुसऱ्या बँकेचा वापर करून कर्जाची रक्कम भरण्यास सांगितले.

खार पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ते या रॅकेटमध्ये बँक कर्मचार्‍याचा सहभाग असू शकतो का याचा तपास करत आहेत कारण त्या महिला कॉलरला बिल्डरच्या वाहन कर्जाच्या पेमेंटबद्दल पूर्ण माहिती होती.

"तपासाचा भाग म्हणून, आम्ही आता ज्या बँक खात्यात पैसे जमा केले होते त्याचा तपशील मागवला आहे," असे अधिकारी म्हणाले. वाधवाच्या व्यवस्थापकाने लिंकवर क्लिक केल्यानंतर 47,002 रुपये डेबिट झाले असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हॅकर्समुळे आणि कधी- कधी लोकांच्या निष्काळजीपणामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या काळात अनेक जण याला बळी पडले आहेत.

सायबर क्राईम मध्ये फसवणूक झालेल्यांसाठी गृह मंत्रालयाने एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला होता. सायबर क्राईमशी संबंधित घटनांची तक्रार तुम्ही या क्रमांकावर करू शकता.

सायबर हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करून तुम्ही सायबर फसवणुकीची तक्रार करू शकता. यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेले पैसे परत मिळण्यास मदत होईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply