Cyber Crime : महिला IPS अधिकाऱ्याच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट; अनेकांना मागितले पैसे

छत्रपती संभाजीनगर : पोलिस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्विटरवर बनावट खाते उघडले होते. त्या खात्यावरून एका बालकाला वैद्यकीय मदतीसाठी पैशांचे आवाहन केले. मात्र हे खाते बनावट असल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर सायबर पोलिसांच्‍या कारवाईनंतर ते बंद केले. 

लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने व्टिटरवर बनावट अकाऊंट उघडले होते. एका बाळाचे लिव्हर ट्रान्सप्लांट करायचे असून त्याच्या उपचारासाठी पैसे पाठवा; असे लिहून त्यासोबत बाळाचा उपचाराचा फोटो आणि आर्थिक मदत पाठविण्यासाठी फोन पेचा क्यूआर कोडही दिला.

अनेकांनी पाठविले पैसे

अधिकारीचे आवाहन असल्‍याने क्‍यूआर कोडवर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैसे पाठविले होते. काहींनी पैसे पाठविल्यानंतर पाटील यांना हे समजले. त्यांनी शहर, ग्रामीण आणि रेल्वे सायबर पोलिसांना बनावट खात्याची माहिती दिली. सायबर पोलिसांच्या तातडीच्या कार्यवाहीनंतर सोमवारी मध्यरात्री बनावट खाते बंद करण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply