Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष, नंदुरबारमध्ये 78 लाखांचा गंडा

Cyber Crime : समाज माध्यमात वेगवेगळ ग्रुप तयार करुन त्यावर जादा पैसे देण्याचे अमिष दाखवत लाखाे रुपयांची फसवणुक करणा-या टाेळ्या नंदुरबार जिल्ह्यात घडल्याचे समाेर आले आहे. नंदुरबार पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार दोन प्रकरणांत तब्बल 78 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणांचा तपास सुरु आहे.

सायबर क्राइममध्ये चोरटे अनेक नवनवीन फंडे वापरून अनेकांना लाखो रुपयांना चुना लावत असल्याचा प्रकार आता समोर येऊ लागला आहे. शेअर बाजाराकडे नागरिकांचा वाढलेला कल बघता त्यासाठी आता समाज माध्यमातून विविध प्रकारचे ग्रुप तयार केले जात आहेत.

Maharashtra Politics : 'मंत्रिपदासाठी रोहित पवार अजितदादांच्या संपर्कात,' भाजप आमदाराच्या दाव्याने राजकारण ढवळून निघालं

यात लोकांचा विश्वास संपादित केला जात आहे. त्यांनंतर जादा पैशांचे अमिष दाखविले जाते. त्यातून काही जणांना लाखो रुपयांचा चुना लावला गेल्याचा प्रकार नुकताच समाेर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अशा दोन प्रकरणांत तब्बल 78 लाखांची फसवणूक झाली आहे. पाेलिसांनी नागरिकांनी जादा पैशांच्या अमिषाला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply