Cyber Crime : घाटीच्या महिला निवासी डॉक्टरला ३ लाखाचा गंडा; नफा मिळवून देण्याचे आमिष

Cyber Crime : सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत.  अशात व्हाट्सअप ग्रुपवर शेअर मार्केटच्या ट्रेंडिंगमध्ये चांगला नफा देण्याचे आमिष देत घाटीतील एका निवासी महिला डॉक्टरला ३ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.

सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळे आमिष दाखवत किंवा गुंतवणुकीतून चांगला नफा तसेच मोबाईलवर विशिष्ट प्रकारचे अँप डाऊनलोड करण्याचे सांगून पैशांची फसवणूक केली जात असते. असाच प्रकार संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील  एका डॉक्टराच्या बाबतीत घडला आहे. या प्रकारात तब्बल ३ लाख रुपये गंडविले आहे. 

रक्कम विड्रॉलच झाली नाही 

घाटी रुग्णालयातील महिला निवासी डॉक्टरला १३ फेब्रुवारीला एक बँक खात्याचा नंबर देऊन त्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार डॉक्टर महिलेने दोन लाख रुपये पाठविले. त्यावेळी खात्यावर रक्कम वाढल्याचे दिसत होते. मात्र पैसे विड्रॉल होत नसल्याने हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी आपली फसवणूक झाली असल्याने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply