
Mumbai : बोरिवली ते कांदिवली ते दरम्यान असलेला 1 महिन्याचा ब्लॉक नुकताच संपला असला तरीही प्रवाशांचे हाल कायम राहणार आहेत. कारण आजपासून (1 February) सीएसएमटी रेल्वे स्थानकावर तब्बल 85 दिवसांचा ब्लॉक सुरू झाला आहे. यामुळे 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिलपर्यंत प्रवाशांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे.
ब्लॉक मगाचं कारण काय?
डिसेंबर 2022मध्ये मध्य रेल्वेनं सीएसएमटी स्थानकाच्या (CSMT Railway Station) पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी दिली होती. यासाठी एकूण 2,450 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांतर्गत स्थानकावरील दोन प्लॅटफॉर्मचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामुळे पुढील 85 दिवस म्हणजेच 3 महिने हे दोन्ही प्लॅटफॉर्म बंद राहतील. रेल लँड डेवलपमेंट अथॉरिटी हे पुनर्विकासाचं काम करत असून शुक्रवारी याबद्दल मध्य रेल्वेने महिती दिली.
|
|
कोणते प्लॅटफॉर्म बंद राहणार?
या ब्लॉकमुळे आजपासून प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 बंद राहणार आहेत. यामुळे या दोन्ही प्लॅटफॉर्मवर थांबणाऱ्या लांब पल्ल्यांच्या ट्रेन आता दुसऱ्या स्थानकावर थांबणार आहेत. यामुळे सामान्य लोकल ट्रेनच्या वेळापत्रकावर फारसा परिणाम होणार नसला तरी काही लोकल विलंबाने धावतील.
कोणत्या एक्सप्रेसवर परिणाम?
या ब्लॉकमुळे सीएसएमटी येथे येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या दादरपर्यंतच थांबवण्यात येतील. दादरपर्यंत थांबवण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये अमरावती–सीएसएमटी एक्सप्रेस (12112), बल्लारशाह–सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस (110002), हावडा–सीएसएमटी एक्सप्रेस (12810), भुवनेश्वर–सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस (11020), बिदर–सीएसएमटी एक्सप्रेस (22144) / लातूर–सीएसएमटी एक्सप्रेस (22108) आणि मडगाव–सीएसएमटी तेजस एक्सप्रेस (22120) यांचा समावेश आहे. शिवाय मंगळुरू - सीएसएमटी एक्सप्रेस (12134) ठाण्यापर्यंतच थांबेल. तरी प्रवाशांनी याची दखल घ्यावी असे अवाहान मध्य रेल्वेनं केलं आहे
सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पात एकूण 461,534 चौरस मीटर जागेचा समावेश आहे. यामध्ये प्रवाशांना सुविधा देणाऱ्या स्वतंत्र इमारती, पार्सल सेवा, मेल/एकस्प्रेस आणि लोकल ट्रेनला जोडणारे डेक, नवे पादचारी पूल, स्कायवॉक अशा गोष्टींचा समावेश आहे. ही कामं पूर्ण होताच सीएसएमटी रेल्वे स्थानक प्रवासासाठी अधिक सुखकर होणार आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “CSMT Railway Station : आजपासून सीएसएमटी स्थानकावर ब्लॉक; पुढील ३ महिने ‘हे’ प्लॅटफॉर्म बंद, अनेक गाड्या दादर–ठाण्यापर्यंतच धावणार”