CSK vs RCB : रविंद्र जडेजा ठरतोय RCB साठी ‘कर्दनकाळ’

नवी मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या हंगामात चार पराभवानंतर अखेर पहिल्या विजयाची चव चाखली. त्यांनी रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) 23 धावांनी पराभव केला. सीएसकेने पहिल्यांदा बॅटिंग करताना 216 धावांचा डोंगर उभारला होता. त्यात शिवम दुबेने 95 धावांची तर रॉबिन उथप्पाने 88 धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर गोलंदाजीत सीएसकेच्या फिरकीपटूंनी आरसीबीच्या फलंदाजांना यशस्वीरित्या रोखले. महीश तीक्षाणाने 4 तर रविंद्र जडेजाने 3 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे रविंद्र जडेजाने आरसीबी विरूद्ध एक खास विक्रम देखील केला.

रविंद्र जडेजाने आरसीबीविरूद्ध डी. वाय. पाटील स्टेडियमवर 3 विकेट घेतल्या. त्यामुळे त्याची आरसीबीच्या एकूण विकेट घेण्याची बेरीज 26 विकेट्स पर्यंत पोहचली. त्याने आरसीबीविरूद्ध सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अबाधित ठेवला. त्यामुळे आरसीबीसाठी रविंद्र जडेजा हा कर्दनकाळ ठरतोय.

रविंद्र जडेजा बरोबरच सीएसकेकडून खेळणाऱ्या श्रीलंकन फिरकीपटू महीश तीक्षाणाने (Maheesh Theekshana) देखील आरसीबीच्या फलंदाजांना सतावले. त्याने आपल्या चार षटकांच्या कोट्यात 4 विकेट काढून देत आरसीबीच्या धावगतीला ब्रेक लावला. चेन्नईने या सामन्यात आपला पहिला विजय मिळवला. तर आरसीबीचा यंदाच्या हंगामातील हा दुसराच पराभव होता. विजयानंतर रविंद्र जडेजाने कर्णधार म्हणून आपला पहिला विजय हा आपल्या पत्नीला समर्पित केला. याचबरोबर त्याने मी कर्णधार म्हणून अजून शिकतोय असे सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply