Crime News : डॉलर्स एक्स्चेंजच्या आमिषाने महिलेची फसवणूक; १ लाख रुपये घेऊन पसार, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


Navi Mumbai: वाशी कोपरी गावात मेस चालवणाऱ्या एका महिलेची तब्बल १ लाख रुपयांत फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तीन अनोळखी व्यक्तींनी बनावट डॉलर्स एक्स्चेंजच्या आमिषाने हि फसवणूक केली असून या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला बदलापूर (पूर्व) येथील शिरगावची रहिवासी असून कोप्री गावात मेस चालवते. याच दरम्यान तिघा अनोळखी व्यक्तींनी महिलेशी फोनवरून संपर्क साधला. यात त्यांनी त्यांच्याकडे अमेरिकन डॉलर्स असल्याचे सांगितले. १ लाख रुपयांच्या बदल्यात १,६०० यू.एस. डॉलर्स ($२०च्या नोटा) देण्याचे आमिष त्यांनी दाखवले.

 

 

महिलेने दिली १ लाखांची रोख रक्कम महिलेला विश्वासात घेत तिघा जणांनी महिलेच्या मेसमध्ये येऊन प्रत्यक्ष व्यवहार करण्यास तयारी दर्शविली. यामुळे महिलेनं विश्वास ठेवून अमेरिकन डॉलर मिळणार यावर विश्वास ठेवत १ लाख रुपये रोख रक्कम दिली; मात्र पैसे घेतल्यानंतर तिघेही डॉलर्स न देता घटनास्थळावरून फरार झाले. अचानकपणे घडलेल्या या प्रकाराने महिला भांबावून गेली होती. यानंतर तिने लागलीच पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

पोलिसांकडून तपास सुरु

त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, आरोपींनी संपर्कासाठी वापरलेला फोन क्रमांकही तपासात आहे. ही घटना पूर्वनियोजित फसवणुकीची असल्याचे पोलिसांचे प्राथमिक निरीक्षण आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *