Crime News : साध्या भोळ्या कोकणी माणसांना फसविणा-या जळगावमधील भोंदूबाबाला चिपळूणमध्ये अटक

Crime News : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात जादूटोणा करणाऱ्या एका बाबाला चिपळूण पाेलिसांनी आज (गुरुवार) अटक केली. पाेलिसांनी बाबा राहत असलेल्या फ्लॅटमधून जादुटोणा करण्याचे सर्व साहित्य जप्त केले.

चिपळूण शहरातील एका अलिशान फ्लॅटमध्ये बाबा त्याचा दरबार चालवत असे. एका जागृत महिलांने पाेलिसांकडे बाबाची तक्रार केली. त्यानंतर पाेलिसांनी आज ही धाडसी कारवाई केली. बाबाच्या फ्लॅटवर पाेलिसांनी धाड टाकली.या फ्लॅटमधील बाबाच्या रूमम मध्ये पाेलिसांना मद्याच्या बोटल सापडल्या.

Dhule News : कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या ३५ बुलेट जप्त; धुळे वाहतूक पोलिसांतर्फे कारवाई

पाेलिसांनी त्याला काही प्रश्न केले. त्यावेळी त्याची भांबेरी उडाली. अधिक चाैकशीनंतर पाेलिसांनी बाबाला ताब्यात घेतले. त्याच्याकडील जादुटोणा करण्याचे सर्व साहित्य जप्त केले. या प्रकरणी पाेलिसांनी बाबासह एकाला ताब्यात घेतले असून अन्य दाेघांचा तपास सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply