Crime News : जानकी रामनगर परिसरात धाडसी चाेरी, साेने, चांदीसह लाखाेंची रक्कम पळवली; आझाद नगर पाेलिसांचा तपास सुरु

Crime News : धुळे  शहरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एका घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह जवळपास दीड लाख रुपयांची रोकड लांबवली. या प्रकरणी प्रफुल्ल नवनीतलाल जैन यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदवली. या चाेरीचा आझाद नगर पोलिस तपास करीत आहेत.

धुळे शहरातील जानकी रामनगर येथे रात्री चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजा तोडून आत प्रवेश करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह जवळपास एक ते दीड लाख रुपयांच्या रोकड वर देखील डल्ला मारला आहे. कुटुंबीयांना या चोरीचा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ आझाद नगर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.

Crime News : लातूर-बार्शी महामार्गावर युवकांनी माजवली काेयताने दहशत, एकास अटक

या घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. प्रफुल्ल नवनीतलाल जैन यांनी घटनेची माहिती पाेलिसांना दिली. आझाद नगर पोलीस या चोरीचा तपास करीत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply