Covid JN.1 Cases : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार; पुण्यात एकाच दिवशी ५९ रुग्ण, राज्यात काय परिस्थिती?

Covid JN.1 Cases : नवीन वर्ष सुरू होताच कोरोनाच्या जेएन.१ व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. संपूर्ण राज्यात या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी पुण्यात जेएन.१ चे तब्बल ५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या २५० इतकी झाली आहे.

चिंताजनक बाब म्हणजे, राज्यात आढळून आलेल्या २५० रुग्णांमधील १५० रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यातील आहे. पुण्यात जेएन.१ व्हेरिएंटचा वाढता प्रसार पाहता, नागरिकांनी काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असा सल्ला देण्यात आला आहे. 

Pune News : पुण्याच्या मुळशीत कार तलावात पडली; एकाचा बुडून मृत्यू

राज्यात जेएन.१ चा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर ठाण्यापाठोपाठ पुण्यातही या व्हेरिएंटने शिरकाव केला. गेल्या २४ तासांत पुण्यात जेएन.१ चे सर्वाधिक ५९ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील जेएन.१च्या एकूण रुग्णांपैकी ६० टक्के पुण्यात आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

जेएन.१ व्हेरिएंटची रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे: नागपूर ३०, मुंबई २२, सोलापूर ९, सांगली ७, ठाणे ७, जळगाव ४, अहमदनगर ३, बीड ३, छत्रपती संभाजीनगर २, कोल्हापूर २, नांदेड २, नाशिक २, धाराशिव २, अकोला १, रत्नागिरी १, सातारा १, सिंधुदुर्ग १ आणि यवतमाळ १ अशी रुग्णसंख्या आहे.

जेएन. १ व्हेरिएंटपाठोपाठ राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. मागील २४ तासांत राज्यात कोरोनाच्या ६१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्याच वेळी ७० रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एकही रुग्णाच्या मृत्युची नोंद झाली नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply