Covid 19 XE Variant: देशात नव्या व्हेरियंटचा शिरकाव, गुजरातमध्ये पहिला रुग्ण

नवी दिल्ली: देशातील करोनाची तिसरी लाट ओसरल्याचे चित्र असतानाच, कोरोनाच्या (Covid 19) नव्या व्हेरियंटचं संकट घोंघावत आहे. रिपोर्टनुसार, गुजरातमध्ये कोरोनाचा एक्सई (covid 19 XE) व्हेरियंटचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला आहे. जगभरात जवळपास ६०० जणांना कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. देशात कोरोनाच्या या नवीन व्हेरियंटनं शिरकाव केला असून, पहिला रुग्ण गुजरातमध्ये सापडला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं खबरदारी म्हणून पाच राज्यांना 'अॅलर्ट' केलं आहे. केंद्राच्या आरोग्य विभागानं महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, केरळ आणि मिझोराम सरकारशी यासंबंधी पत्रव्यवहार केला असून, करोनाच्या नवीन रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे.

ओमिक्रॉन व्हेरियंटपेक्षा अधिक घातक नाही

रिपोर्टनुसार, केंद्रीय आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, गुजरातमध्ये कोरोना विषाणूचा नवीन एक्सई व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. या राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा विषाणूचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन व्हेरियंटपेक्षा जास्त घातक नाही. मात्र, तरीही ही चिंतेची बाब आहे.

पाच राज्यांसाठी अॅलर्ट

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत आरोग्य मंत्रालयानं पाच राज्यांसाठी 'अॅलर्ट' जारी केला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, केरळ आणि मिझोराम सरकारला यासंबंधी पत्र पाठवले असून, कोरोना रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत खबरदारी घेण्यास सांगितले आहे. या परिस्थितीवर लक्ष ठेवतानाच, गरज भासल्यास राज्य सरकारांनी कोविड १९ संबंधी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, असेही सांगितले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply