Corona Virus Update : चिंताजनक! ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी; धाकधूक वाढली

Corona Virus Update : कोरोना विषाणूने पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवली आहे. ठाण्यात कोरोना विषाणूमुळे मुंब्रा येथे राहणारा तरुणाचा मृत्यू झाला आहे. २१ वर्षीय तरुण गेल्या काही दिवसांपासून कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तरुणाच्या मृत्यूने ठाणेकरांची धाकधूक वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कळवा रुग्णालयात उपचार घेणार्‍या २१ वर्षीय युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंब्रा येथे राहणाऱ्या युवकाला शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या तरुणाला मधुमेह असल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं आहे. २०२५ वर्षातील हा पहिला बळी असल्याचं बोललं जात आहे. ठाण्यातील कळवा रुग्णालयात सध्या दोघांवर उपचार सुरु आहेत. ठाण्यात रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे.

ठाण्यातील १० रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. काही रुग्णांवर घरीच उपचार सुरु आहेत. कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांनी सतर्क राहावे,असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहे. कळव्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.

Beed News : गाढ झोपेत असतानाच सापाने दंश केला,बहिण-भावाचा जागेवरच मृत्यू; बीडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना

राज्यात करोनाचे आणखी ४५ रुग्ण

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरू होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत आणखी ४५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांची धाकधूक वाढली आहे. राज्यात सर्वाधिक ३५ रुग्ण मुंबईत आहेत. पुण्यातही ४ जणांना संसर्ग झालेला आहे. या महिन्यात कोरोनाचे एकूण १७७ रुग्ण आढळले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ४५ रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे. त्यात मुंबई ३५, पुणे महापालिका ४, रायगड २, कोल्हापूर महापालिका २, ठाणे महापालिका १ आणि लातूर महापालिका १ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात १ जानेवारी ते २३ मेपर्यंत करोनाच्या ६ हजार ८१९ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात २१० रुग्णांना करोनाचे निदान झाले. मुंबईत सर्वाधिक १८३ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील ८१ करोना रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply