Corona Vaccine : चीनने पुन्हा टेन्शन वाढवलं; 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'कडून केंद्र सरकारला मदतीचा हात

 

Corona Vaccine : चीनसह काही देशात कोरोना रुग्णात वाढ होत आहे. काही देशात कोरोना रुग्ण वाढत असताना सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) केंद्र सरकारला कोव्हिशील्ड लसच्या दोन कोटी मोफत डोस मदतीच्या स्वरुपात देण्याच्या विचारात आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूटचे प्रकाश कुमार सिंग यांनी आरोग्य मंत्रालयाला ४१० कोटी रुपयांचे मोफत डोस देण्यासाठी पत्र लिहिले आहे. सिंग यांनी हे मोफत डोस सरकारला कसे देता येईल, याबाबत विचारणा केली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आतापर्यंत , सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत सरकारला कोव्हिशील्डच्या १७० कोटी रुपयांचे मोफत डोस दिले आहेत. चीन आणि दक्षिण कोरियासहित अन्य काही देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात अलर्ट जारी केला आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.

अधिकृत सूत्रांनी बुधवारी सतर्क केले आहे की, देशासाठी पुढील चाळीस दिवस महत्वाचे असणार आहेत. कारण देशात जानेवारी महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. तर दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे की, कोरोनासाथ लाट पुन्हा परतल्यास देशात कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होण्याऱ्या रुग्णांची संख्या कमी असेल.

केंद्र सरकारने शनिवारी विमानातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देशात कोरोना साथीचा सामना करण्यासाठी एक बैठकीचं आयोजन केलं होतं. तसेच मंगळवारी देशभरात कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक रुग्णालयात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply