Corona Update : ऐन दिवाळीच्या तोंडावर संभाजीनगरात कोरोनाची एन्ट्री; चार वर्षीय चिमुकली पॉझिटिव्ह

Corona Update : एकीकडे सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असतांना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर  शहरात चार वर्षीय चिमुकलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरामध्ये राहणाऱ्या एका चार वर्षीय मुलीला कोरोना झाल्याने आता तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. एका खाजगी रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे या मुलीच्या पालकाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

मागील वर्षभरापासून जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे कोरोना हद्दपार झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र, शनिवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज भागातील अचानक एका चिमुकलीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे याची माहिती रुग्णालयाकडून तातडीने महानगरपालिका आरोग्य विभागाला देण्यात आली. वर्षभरानंतर शहरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने मनपा आरोग्य यंत्रणाही हादरली आहे. आगामी सणासुदीचा काळ पाहता आणि होणारी गर्दी लक्षात घेता आरोग्य विभागाकडून त्यादृष्टीने पाऊलं उचलल्या जाण्याची शक्यता आहे. 

Gram Panchayat Election : राज्यभरातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींचे 'कारभारी' आज ठरणार, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; पुणे जिल्ह्याकडे राज्याचं लक्ष

 

चिमुकलीच्या पालकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह 

मनपा आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने चिमुकली उपचार घेत असलेल्या खाजगी रुग्णालय गाठले. तसेच या चिमुकलीच्या पालकांची चाचणी केली आहे. सोबतच तिच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहितीसह इतर माहिती घेण्यात आली. मात्र, चिमुकलीच्या पालकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता चिमुकलीला कोरानाची लागण झालीच कशी, असा प्रश्न निर्माण होत असून त्यादृष्टीने आरोग्य विभागा आता कामाला लागला आहे. 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply