मुंबई :  कोरोनाने टेन्शन वाढवलं! मुंबईत सलग पाचव्या दिवशी आढळली मोठी रुग्णसंख्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी एकट्या मुंबईमध्ये ३१८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सलग पाचव्या दिवशी मुंबईमध्ये ३०० हून अधिक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. 

चिंताजनक बाब म्हणजे रविवारी सुद्धा मुंबईत ३७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण रुग्णसंख्या १० लाख ६५ हजार २९६ वर पोहोचली आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी शून्य मृत्यूची नोंद झाली.

मुंबईत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १९ हजार ५६६ आहे. तर दिवसभरात १५० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ४३ हजार ४९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत सध्या २,२३८ सक्रिय रुग्ण आहेत. शहरात रविवारी ५ हजार १०७ चाचण्या करण्यात आल्या. सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply