Corona News : भय इथले संपत नाही; गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७७४ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू

Corona News : कोरोना पुन्हा घाबरवताना दिसत आहे. देशभरात कोरोनाच्या  रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत कोविडचे ७७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तरीही कोरोना रुग्णांना घरीच ठेवण्याचा सल्ला दिला जातोय, असं का? ते आपण जाणून घेवू या.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार १८७ आहे. आज सकाळी ८ वाजता मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत तामिळनाडू आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झालाय. 

MNS Protest Against Jitendra Awhad : श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना मनसे धडा शिकवणार, जितेंद्र आव्हाडांवर अंधेरीत गुन्हा दाखल

कोरोनाच्या तीन लाटा

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून JN.१ च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती मिळतेय. परंतु रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. तसंच मृत्यूदरात कोणतीही वाढ झालेली नाही. सध्या देशातील ९२ टक्के कोरोना सक्रिय रुग्णांना घरीच अलग ठेवण्याचा सल्ला दिला जातोय.

आतापर्यंत भारतात कोरोनाच्या तीन लाटा आल्या (corona death) आहेत. साडेचार कोटींहून अधिक लोकांना या महामारीची लागण झाली आहे. ५.३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, या आजारातून बरं झालेल्या लोकांची संख्या ४.४ कोटींहून अधिक आहे. आतापर्यंत देशात २२०.६७ कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

JN.१ ची लक्षणं

गेल्या काही महिन्यांत कोरोनाच्या JN.१ व्हेरियंटच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली आहेत. या व्हेरियंटचा संसर्ग वेगाने होतोय. तरी बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. ताप,खोकला, सर्दी, घसा खवखवणे, अंगदुखी आणि थकवा ही सामान्य लक्षणं आहेत. ही लक्षणं व्हायरल फ्लू किंवा इतर श्वसन आजाराशी संबंधित आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply