Corona JN.1 Veriant Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आवाज जाण्याचा धोका; संशोधनात धक्कादायक खुलासा

Corona JN.1 Veriant Update : कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत अनेक गंभीर आरोग्य समस्या समोर आल्या आहेत. जागतिक स्तरावर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका झपाट्याने वाढताना दिसत आहे. ओमिक्रॉनच्या नवीन सब-व्हेरियंट JN.1 मुळे भारतासह चीन-सिंगापूर अनेक देशांमध्ये कोरोनाच्या केसेसमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे शारीरिक समस्या अनेक प्रकारे वाढू शकतात, त्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की चव आणि वासानंतर आता कोरोना संसर्ग आवाज देखील हिरावून घेऊ शकतो. कोविड-19 मुळे व्होकल कॉर्ड पॅरालिसीसची एक केस समोर आली आहे.

Samruddhi Expressway Accident : मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या कारचा समृद्धीवर भीषण अपघात, वाहन चालकाचा जागीच मृत्यू

 

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स डोळे आणि कान स्पेशालिस्ट रुग्णालयातील संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, कोरोना संसर्गामुळे मज्जासंस्थेशी संबंधित किंवा न्यूरोपॅथिक गुंतागुंत देखील निर्माण होऊ शकते. यामुळे व्होकल कॉर्डला पॅरालिसीस होतो, ही बाब समोर आली आहे.

जर्नल पेडियाट्रिक्समधील एका संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोनामुळे केवळ चव आणि वासच नाही तर घशाचा आवाज देखील जाऊ शकतो. याला व्होकल कॉर्ड पॅरालिसिस म्हणतात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply