Congress News : ठाकरेंशी वाद भाेवला, काॅंग्रेस नेते नरेंद्र जिचकार पक्षातून निलंबित

Congress News :  पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत नागपूर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव नरेंद जिचकार यांचे सहा वर्षांसाठी काॅंग्रेसचे प्रथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या शिस्त पालन समितीने जिचकार यांच्यावर कारवाई केली आहे.

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात नागपूर येथील महाकाळकर सभागृहात काँग्रेसने आयाेजिलेल्या विभागीय बैठकीत नरेंद्र जिचकार आणि शहराध्यक्ष तथा आमदार विकास ठाकरे यांच्यात जोरदार राडा झाला होता. या बैठकीत माईक हिसकावल्याच्या कारणावरून हा वाद झाला होता.

Dhangar Aarakshan : धनगर आरक्षणासाठी युवकानं संपवलं जीवन; परभणीमधील खळबळजनक घटना

या बैठकीस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , विजय वडेट्टीवार, सुनील केदार  यासह अनेक नेते उपस्थित हाेते. ज्येष्ठ नेत्यांच्या समाेर आमदार ठाकरे आणि जिचकार यांच्यात वाद झाला होता.

या राड्यानंतर शिस्त पालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांना तक्रार करून काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. जिचकार यांना कारणे दाखवा नोटीसही पक्षाकडून बजावण्यात आली होती.

या संदर्भात त्यांनी 23 ऑक्टोबरला 2023 ला दिलेले उत्तर हे समाधानकारक नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल काँग्रेस प्राथमिक सदस्य पदावरून सहा वर्षांसाठी काढून टाकण्यात आले आहे असे पक्षातून सांगण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply