CM Shinde : सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या लोकांना काय दिसणार; मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी

CM Shinde : भंडारा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महायुतीचे तिन्ही नेते एकत्र दिसले. दरम्यान विरोधकांकडून सरकारच्या या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमावरून टीका केली जाते. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी भाषणातून उत्तर दिलं. याशिवाय त्यांनी उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली. हा इव्हेंट असल्याची पोटदुखी अनेकांना आहे. गर्दी पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

या कार्यक्रमात तिन्ही नेत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. शेतकऱ्यांना दुप्पट लाभ आपण देण्याचं काम आपल्या सरकारने केल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत. यादरम्यान अजित पवार गट सत्तेत सामील का झाला याचं कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अजित पवार आपल्यासोबत आले. देशाचा विकास वेगाने सुरू आहे. सर्वांगीण विकास करण्याचं काम सरकार करत आहे. ही भावना लक्षात ठेवून एकत्र आल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

Akola Crime News : अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार, सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र; म्हणाल्या, गृहमंत्री सपशेल अपयशी

पीक पाहणीची मुदत वाढवण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केली. १५ तारखेऐवजी ३० तारखेपर्यंत करावी, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. याचबरोबर त्यांनी धानाला बोनस देण्याची घोषणा नागपूर अधिवेशनात जाहीर करण्यात येणार आहे. याविषयीची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मागणी केलीय. परंतु अजित पवार यांच्याकडे तिजोरी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत. भंडारा जिल्ह्याचा विकास करण्यास सरकार कटिबद्ध आहे. भंडरा जिल्ह्यात पर्यटनाचा विकास आव आहे. पर्यटनावर काम केल्यानंतर लोकांच्या हाताला काम मिळेल. लोकांना रोजगार मिळेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply