CM Eknath Shinde Threat Call : 'मी एकनाथ शिंदे यांना उडवणार'; पुण्यातून धमकीचा फोन, कॉलर अटकेत

पुण्यातून मोठं वृत्त हाती आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडवून देण्याची धमकी आली आहे. ११२ नंबरवर फोन करून धमकी देण्यात आली होती. पुण्यातील वारजेतून मुख्यमंत्री शिंदेंना उडवून देण्याच्या धमकीचा फोन आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा धमकी आली आहे. पुण्यातील वारजेतून मुख्यमंत्री शिंदेंना उडवून देण्याच्या धमकीचा फोन आला आहे. मुख्यमंत्र्यांना १२२ या आतपत्कालीन हेल्पलाईन सेवेच्या क्रमांकांवर कॉल आला होता.

आरोपी मुंबईतील अंबिका लेदर्समध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. पुणे क्राईम ब्रँचने ४२ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. ४२ वर्षीय राजेश आगवणे असे आरोपीचे नाव आहे.

मद्य प्राशन करून केला कॉल

आरोपी राजेश आगवणे हा मुंबईच्या धारावीचा रहिवाशी आहे. राजेशची बायको पुण्यातील धायरीतील असून तिच्याकडे आला होता. राजेशनने रात्री १२ वाजता नशेत पोलिसांची १२२ या आतपत्कालीन हेल्पलाईनवर कॉल केला. त्याने पत्नी सोबत असतानाच फोन केला. त्यानंतर पत्नीने फोन घेत पोलिसांना तो नशेत असल्याचे सांगितले.

आरोपी राजेशने नशेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सकाळी ताब्यात घेतल्यावर देखील नशेत होता. त्याने ताब्यात घेतल्यानंतर छातीत दुखत असल्याची तक्रार करत रुग्णवाहिका मागण्यासाठी पोलिसांना फोन केल्याचे सांगितले. पोलिसांनी १०८ ला फोन करायला सांगितलं. मात्र, त्याने थेट मुख्यमंत्र्यांना उडवून देण्याची धमकी दिली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही आरोपी नशेत होता, अशीही माहिती मिळाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply