Eknath Shinde: आरोपी फायर करतो, पोलीस शोपीस धरणार का? एन्काऊंटर प्रकरणावरुन CM शिंदेंचा सवाल; विरोधकांना फटकारले

CM Eknath Shinde : पुणे शहरातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पहिल्या भूमिगत मेट्रोच्या प्रवासी सेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. त्याचबरोबर स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन, भिडे वाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन अशा विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी नेते यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना CM शिंदे यांनी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर तसेच लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांवर जोरदार टीका केली.

'उद्घाटन सोहळा २६ सप्टेंबर रोजी होणार होता. मात्र त्या दिवशी पाऊस होता. मोदीजी संवेदनशील मनाचे आहेत. जेव्हा सकाळी चर्चा केली तेव्हा पुणेकरांना त्रास होऊ नये या गोष्टी पंतप्रधान यांनी लक्षात घेतल्या आणि कार्यक्रम रद्द केला. संवेदनशील पंतप्रधान कसा असतो हे त्यांनी दाखवलं. उद्घाटन केलं असतं तर विरोधक म्हणले असते लोकांना त्रास देऊन केलं. म्हणजे इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं..,' असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला.

Kasara Ghat : मोठा अपघात टळला; प्रवाशांचा जीव मुठीत, जुन्या कसारा घाटात बस दरीत कोसळताना बचावली

तसेच 'विरोधक बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी द्या फाशी द्या म्हणले. आता एन्कांऊंटवरुन टीका करतात. आरोपी फायर करतो तेव्हा पोलीस शोपीस धरणार का? ते केलं नसतं तर म्हणणार बंदूक शोपीससाठी आहे का? इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं, दोन्ही बाजूने बोलणाऱ्यांना काय म्हणतात? ' असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला.

तसेच विरोधक लाडक्या बहीण योजनेत खोडा घालतात. पण लाडक्या बहिणींची योजना हिट झाली आहे. कोटी ९० लाख बहिणींच्या खात्यात गेले आहेत लवकरच सगळे पैसे दिले जाणार आहेत. किती ही खोडा घाला, ही योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केली नाही. माझ्या बहिणी त्यांना जोडे दाखवतील, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांचा समाचार घेतला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply