प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, जाणून घ्या कुठे-कुठे धावणार

CM Eknath Shinde Launches E-Shivneri Bus: महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या ई-शिवनेरी बसचे लोकार्पण करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने मुंबई ठाणे दरम्यान इंटरसिटी इलेक्ट्रिक बसेस प्रवासी सेवेत आणल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग मंडळाच्या ताफ्यात ई-शिवनेरी बस दाखल झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिक आरामदायी होणार आहे.

एमएसआरटीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली ई-शिवनेरी बस मुंबई-ठाणे- पुणे या मार्गावर धावणार आहे. ऑलेक्ट्रा ग्रिनटेकने ही इलेक्ट्रिक उर्जेवर धावणारी , आवाजरहित, प्रदूषणरहित इंटरसिटी ई-शिवनेरी बस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (MSRTC) महामंडळाला सुपुर्द केली आहे.

ई-शिवनेरी बसची वैशिष्ट्ये

नव्याने दाखल झालेल्या ई-शिवनेरी बसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये ABS सह डिस्क ब्रेक, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, रिअल टाइम ट्रॅकिंग सिस्टिम, सामानासाठी जागा, युएसबी कनेक्शनसह , सीट बेल्ट असलेली पुश बॅक सीट आणि Advance वाहन व्यवस्थापन प्रणाली असे फीचर्स या बसमध्ये मिळणार आहेत.

एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षा ई-शिवनेरी बसच्या लोकार्पणाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply