CM Eknath Shinde: 'माझं कुटुंब उद्धवस्त झालं तेव्हा.. ', मुख्यमंत्र्यांनी सांगितली आप्पासाहेबांची ती आठवण!

Navi Mumbai News: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी 'माझं कुटुंब उद्धवस्त झालं तेव्हा आप्पासाहेबांनी माझं कुटुंब वाचलं.', असल्याचे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे मनापासून अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आप्पासाहेबांमुळे माझ्या कुटुंबाला दिशा मिळाल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी आणि ज्ञानाची ज्योत घराघरामध्ये लावण्यासाठी धर्माधिकारी कुटुंबाचे मोठे योगदान आहे. लाखो भरकटलेल्या आणि उद्धवस्त झालेल्या कुटुंबाला दिशा दाखवण्याचे काम आप्पासाहेबांनी केले आहे. या लाखो कुटुंबामध्ये माझं एक कुटुंब आहे. माझं कुटुंब उद्धवस्त झाले तेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मला आधार दिला आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मला दिशा दाखवली. हे मी कदापी विसणार नाही.'

'सूर्य पूर्ण ताकदीने आग ओकत आहे आणि तरी देखील सकाळपासून भर उन्हात सर्वजण इथे बसले आहेत. ही आप्पासाहेबांची ताकद आहे. या श्री सदस्यांच्या बैठकीची शिस्त काय असते ही आज याठिकाणी पाहायला मिळत आहे. इकडे लहान-मोठा कोणी नाही सर्व आपण आप्पासाहेबांचे श्री सदस्य आहोत. हा सर्व जनसागर आप्पासाहेबांच्या प्रेमापोटी आहे. सागराला लाजवेल असा महासागर आपण इथे पाहत आहोत. आप्पासाहेब ही तुमची जादू आहे. ही जादू पाहायचे भाग्य आम्हाला मिळाले.' असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

तसंच, राजकीय सत्तेपेक्षा अध्यात्मिक शक्ती मोठी असते याचे स्वरुप आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सगळे विक्रम मोडणारी ही गर्दी आहे. एकादे विक्रम मोडायचे असेल ते फक्त आप्पासाहेबांचे श्री सदस्य मोडू शकतात.', असं त्यांनी सांगितलं.

'माणूस घडवण्याचं विद्यापीठ म्हणजे मुक्कामपोठ रेवदंडा. आपण सर्वत्र देव शोधत असतो. मला या अथांग महासागरामध्ये तुमच्यामध्ये आप्पासाहेबांच्या रुपाने देव दिसत आहे.' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच, 'हा पुरस्कार आप्पासाहेबांना दिल्यामुळे या पुरस्काराची उंची वाढली आहे आणि महाराष्ट्राचा सन्मान वाढला आहे. मी मुख्यमंत्री असताना आप्पासाहेबांना हा पुस्कार दिला जातोय यापेक्षा माझ्या आयुष्यात मोठा क्षण नाही.', असे ते म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांचे देखील कौतुक केले. त्यांनी सांगितले की, 'जेव्हा जेव्हा तुम्ही कोणाच्या मागं उभं राहता. तेव्हा पूर्ण ताकतीनिशी उभं राहता याचा अनुभव मला आणि देवेंद्रजींना आला आहे. आपल्या लाखो करोडो देशवासीयांच्या मनामध्ये आणि बाळासाहेबांच्या मनामध्ये स्वप्न होते की, या देशातलं ३७० कलम हटले पाहिजे, भव्य दिव्य राम मंदिर झाले पाहिजे. हे स्वप्न मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अमित शहांनी करुन दाखवले. अशा नेतृत्वाच्या हस्ते आप्पासाहेबांचा सन्मान होतोय ही आनंदाची गोष्ट आहे.'



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply