CM Eknath Shinde : CM एकनाथ शिंदेंनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा; NDRF, SDRF च्या बैठकीत काय झाली चर्चा?

CM Eknath Shinde : मान्सूला पोषक स्थिती तयार झाली असून जूनच्या ७ तारखेपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत भूस्खलनसारख्या घटना आणि मानवहानी टाळण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील यावर चर्चा करण्यात आली असून त्यानुसार काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीला NDRF, SDRF सह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी कोणत्या केल्या सूचना?

अन्नधान्याचा साठा, गावांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

अडचणीच्या काळात इतर राज्यांशी संपर्क कसा करावा

लोकांना संकटात जागृत करण्याचा प्रयत्न कसा करावा

धोकादायक इमारतीतील लोकांचं स्थलांतरण कसं करता येईल

Pune Porsche Car Accident : ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार प्रकरण, सापळे समितीकडून ससून रुग्णालयात चौकशी सुरू

यावेळी राज्यातील दुष्काळाबाबतही सविस्तर चर्चा झाली. मदत व पंचनामा यावर चर्चा झाली. जनतेला त्रास होऊ नये, जीविताला धोका होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. आपत्तीजन्य परिस्थितीशी लढण्यासाठी आपल्या सर्व यंत्रणा सज्ज आहेत. आजच्या बैठकीतील चर्चा झालेल्या सर्व बाबींची अंमलबजावणी होणार असून संकट येऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply