CM Eknath Shinde : 'ते' सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत फिरताहेत; राहुल गांधींचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा

CM Eknath Shinde : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा काही तासांत होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच आज शनिवारी कॅबिनेटमध्ये राज्य सरकारकडून महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या कॅबिनेटनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली. 'वीर सावरकरांचा अपमान झाला तरी स्वतः ला हिंदुत्वादी म्हणतात, ते त्यांच्यासोबत फिरतात, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केली.

देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 'आज अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. आज ही शेवटची कॅबिनेट होती. सुरुवातीला आम्ही दोघांनीच शपथ घेतली. त्यात आम्ही दोघे होतो. आम्ही सगळ्यांसाठी निर्णय घेतले. सर्व निर्णय जनतेच्या हिताचे घेतले'.

Cabinet Meeting : ब्रेकिंग! लोकसभेच्या आचारसंहितेआधी 'राज्य सरकारचा' धडाका; मंत्रिमंडळ बैठकीत १७ मोठे निर्णय

मनोज जरांगे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले,'आमची एकच भूमिका होती. आरक्षण टिकणारे द्यावे. कोणालाही धक्का न लावता. आम्ही तो निर्णय घेतला. आता समाजातील मुलांना फायदा होत आहे. मागासवर्ग आयोगाने काम केलं. आम्हाला खात्री आहे की, जो निर्णय सरकारने घेतला आहे. तो निर्णय कोर्टात टिकेल. कुणबी प्रमाणपत्र देखील देऊ लागलो आहोत'.
 

मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका

'आम्ही काम केलं आहे. आधी बंद पडलेले सरकार होते. आधी नकारात्मकता होती. फेसबुकवर सरकार चालत नाही. लोक निर्णय घेणाऱ्या बाजूने असतात. त्यामुळे जास्त जागा आमच्याकडे येतील. राहुल गांधी यांनी या आधी अनेक यात्रा काढल्या. वीर सावरकरांचा अपमान झाला तरी त्यांच्यासोबत फिरत आहेत. आम्हाला काय म्हणायचं नाही. जनता त्यांना उत्तर देईल', अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply