CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या '३' मोठ्या घोषणा; हिरकणी गावच्या विकासासाठी २१ कोटी तर इतरही आश्वासनं

मुंबई: विधानसभेत शिंदे सरकार आज बहुमताची परिक्षा पास झाले. १६४ मतं मिळवत एकनाथ शिंदे यांनी विश्वास ठराव जिंकला. सर्वपक्षीय नेत्यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या अनेक आरोपांवर उत्तर दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ३ मोठ्या घोषणा केल्या आहेत. 

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ मोठ्या घोषणा केल्या आहे. यात पहिली घोषणा म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दुसरी घोषणा म्हणजे राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल असं आश्वासन यावेली विधानसभेत देण्यात आलं आहे. सोबत तिसरी घोषणा म्हणजे 'शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र' करण्याचा निर्धार शिवसेना-भाजप युती सरकारचा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

गुजरातचं नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी काही प्लॅनिंग नाही केली, मी बोलत बोलत गेलो त्यात लपवायचे काय? फडणवीसांच आणि आमचं ट्यूनिंग चांगलं आहे. त्यांचा आणि आमचा अजेंडा सेम आहे. आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार केला तिकडे गेलो. पुढच्या विधानसभेत भाजप आणि आम्ही दोघे मिळून २०० लोक निवडून येऊ असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच शिवसेनेच्या चिन्हाबाबतही त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, चिन्ह काय मिळणार? आपण शिवसैनिक जिथे लाथ मारू तिथून पाणी काढू. पन्नासमधील एकही माणूस पडू देणार नाही. तसेच पुढच्या विधानसभा निवडणुकीत २०० लोक निवडून आणू जर तसं झालं नाही तर गावाला शेती करायाला जाऊ अंस मोठं वक्तव्यं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply