CM शिंदेंना शेतकऱ्यांची काळजी; अयोध्येतून येताच थेट शिवार गाठलं

रविवारी सायंकाळपासून राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. हाच कळीची मुद्दा पकड विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. अशातच विरोधकांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे थेट अयोध्येतून येताच बांधावर पोहचले आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री आमदार आणि इतर पदाधिकारी हे आयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी गेले होते. तो दौरा पूर्ण करून महाराष्ट्रात परतताच मुख्यमंत्री शिंदे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसाणीची पाहणी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सटाण्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. डाळिंब, कांदा, द्राक्ष आणि गहू यासारख्या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्या भागातील शेतीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनाकडे सुपूर्द करावा अशा सूचना दिल्या होत्या.

या वेळेला त्यांच्यासोबत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डि यांच्यासह स्थानिक आमदार आणि अधिकारी उपस्थित आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply