Chinchwad By-Election : चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, पक्षादेश बाकी

Chinchwad By-Election: भाजपचे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाल्याने या रिक्त जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे चित्र पाहिला मिळत आहे.

दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना या जागेवर तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विठ्ठल काटे कामाला लागले आहेत. जर तिकीट दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला मिळाले तर राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही. अशी चर्चा चालू होती मात्र आता या चर्चांना पुर्ण विराम मिळाला आहे.

चिंचवड विधानसभेसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे विठ्ठल काटे यांनी सांगितले. त्यासाठी चिंचवड मधील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेवून विठ्ठल काटे यांना तिकीट मिळावे यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे मागणी केली जाणार आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी लढवणार आहे.

या पोटनिवडणूकीत विठ्ठल काटे इच्छुक आहेत, २७ तारखेला निवडणूक असल्याने पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. आज चिंचवड पार्टी कार्यालयामध्ये पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची, नगरसेवकांची बैठक पार पडली या बैठकीत निर्णय झाला आहे की काहीही झालं तरी या जागेवर पक्षाने उमेदवार द्यावा अशी मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केली जाणार आहे.

पक्षाकडे मागणी राहील की या ठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार द्यावा. भाजपने कोणालाही उमेदवारी दिली तरीही राष्ट्रवादीने या जागेवर उमेदवार द्यावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र पक्ष जी भूमिका घेईल त्यानुसार काम केल जाणार आहे.

मात्र पक्षाच्या विरोधात जावून कोणताही निर्णय इच्छुक उमेदवार म्हणून घेणार नाही अशी प्रतिक्रिया विठ्ठल काटे यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply