Chhattisgarh : नक्षलवादी हल्ल्यात दोन पोलिस शहीद, एक जखमी; महाराष्ट्र अलर्ट

Chhattisgarh : गोंदिया व छत्तीसगड बॉर्डरवर आज (साेमवार) पोलिस आणि नक्षलांची चकमक झाली. या नक्षली चकमकीत छत्तीसगड येथील दोन पोलिस (police) शहीद झाले. या घटनेत एक पाेलिस कर्मचारी जखमी झाला आहे. नक्षल्यांनी पाेलिसांची मोटरसायकल देखील जाळली आहे. 

महाराष्ट्र  छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीअंतर्गंत आज सकाळच्या सुमारास दहा ते बारा नक्षल्यांनी चहा पाण्यासाठी विनाशस्त्र गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला करुन त्यांना ठार केले.

या घटनेबाबत राजनांदगावचे पोलीस अधीक्षक अभिषेक मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार आज बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह व ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह मोटारसायकलने चहा पिण्याकरीता पोलीस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर असलेल्या ढाब्याकडे गेले हाेते.

त्या परिसरात आधीच दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी दाेघांवर गोळीबार केला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तिसरा कर्मचारी जखमी झाला आहे. नक्षल्यांनी मोटारसायकलला आग लावली. त्यानंतर ते घटनास्थळावरुन पसार झाले आहे. या घटनेनंतर गोंदिया पोलीस व छत्तीसगड पोलीस जंगलात सर्च ऑपरेशन करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply