Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला 'तो' पुतळा सापडला; असा झाला चोरीचा उलगडा

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Stolen : गेल्या महिन्यात कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला गेल्याची घटना घडली होती. उत्तर अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग कापून तो चोरण्यात आला होता. तर, या पुतळ्याचा भाग असलेला अश्वच्या पायांकडील भाग तसाच होता. दरम्यान, आता छत्रपती शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला हा पुतळा अखेर सापडला आहे.

अमेरिकेतील एका भंगार दुकानात हा पुतळा सापडला आहे. संतापजनक बाब म्हणजे, या पुतळ्याला फोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.शिवरायांच्या या पुतळ्याचं वजन सुमारे 200 किलो इतकं आहे. हा पुतळा उत्तर अमेरिकेतील सॅन होजे शहराला 1999 सालात पुणे  शहराकडून भेट स्वरुपात मिळाला होता.

31 जानेवारी रोजी या पुतळ्याची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. अखेर हा पुतळा अमेरिकेतल्या एका भंगाराच्या दुकानात सापडला. हे दुकान अवैध कामांसाठी ओळखले जाते. या दुकानातील ३ कर्मचाऱ्यांनी हा पुतळा या ठिकाणी आणल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यापैकी दोन पुरुष तर एक महिला होती.

या तिघांनी 29 जानेवारी रोजी हा पुतळा चोरला होता. 9 फेब्रुवारी रोजी हा पुतळा या दुकानात दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी या दुकानावर धाड टाकली आणि पुतळा हस्तगत केला. मात्र, अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नसून आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, शिवजयंती पुर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सापडल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply