Chhatrapati Shivaji Maharaj : कॅलिफोर्नियातील उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला; पुण्याशी खास कनेक्शन

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Stolen : कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा चोरीला गेला आहे. उत्तर अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. सॅन जोस येथील उद्यानामध्ये हा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला होता. सॅन जोस पार्कच्या विभागाने ट्विट करून हा पुतळा चोरी झाल्याची माहिती दिली आहे. 

ट्विटमध्ये म्हटले आहे की, ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गायब आहे. मात्र, तो कधी चोरीला गेला हे स्पष्ट झालेले नाही. पुतळा चोरीला गेल्यानंतर त्याला शोधण्यासाठी आम्ही समुदायाच्या नेत्यांसोबत काम करत असून याबद्दल आम्ही सतत अपडेट देत राहू, असे विभागाने ट्विटमध्ये  म्हटले आहे. अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यांनी लोकांकडून मदत मागितली आहे, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

पुण्याशी खास कनेक्शन

कॅलिफोर्नियातील सॅन जोस हे शहर पुण्याचे  'सिस्टर शहर' म्हणून ओळखले जाते. या उपक्रमाअंतर्गत सॅम जोस शहराला हा पुतळा भेट म्हणून देण्यात आला होता. उत्तर अमेरिकेतील मराठा शासकाचा हा एकमेव पुतळा होता. या घटनेनंतर शहर अतिशय दु:खी असल्याचे ट्विटमध्ये लिहिले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून जनतेची मदत घेण्यात येत असल्याचे विभागाने सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply