Chhatrapati Sambhajinagar News : कोऱ्हाळे फाट्यानजीक अपघातात गाडीचा चक्काचूर, तहसील कार्यालयातील तिघे जखमी

Chhatrapati Sambhajinagar News : कार्यालयीन कामकाज संपवून सिल्लाेडला  निघालेल्या शासकीय वाहनाचा झालेल्या अपघातात तहसिल कार्यालयातील तिघे कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर  जिल्ह्यात घडली. या घटनेतील जखमी झालेल्यांना सिल्लाेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या अपघाताबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी : छत्रपती संभाजीनगर सिल्लोड मार्गावर केऱ्हाळा फाटा जवळील पेट्रोल पंप समोर हा अपघात झाला. तहसील कार्यालयाचे वाहन एका उभ्या असलेल्या वाहतुकीच्या वाहनास धडकले. यामध्ये तिघेजण जखमी झाले.

Unseasonal Rain : भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना फटका बसण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत

या तिघांना सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेत वाहन चालक कयूम देशमुख, कोतवाल राजीव बसेय्या आणि वसीम शेख अशी जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

हे तिघे जण कार्यालयीन कामकाज आटोपून छत्रपती संभाजीनगरकडून सिल्लोडकडे येत होते. यादरम्यान उभे असलेल्या वाहनास पाठीमागून त्यांचे वाहन धडकल्याने जीपच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply